फडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही – रावसाहेब दानवे

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी पुन्हा येईल’ या वाक्यावरून शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला विरोध केला का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर दानवे म्हणाले, राज्यात पाच वर्षात जी विकास कामे झाली. जे संकटे आली ते यशस्वीरित्या हातळाण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामूळे कोणी काहीही म्हटले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बदल होणार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

औरंगाबादमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, “राज्यात पाच वर्षे जी विकास कामे झाली. यासह दोन वेळा राज्यात दुष्काळ पडला. शेतकऱ्यांचे आंदोलन आले, मराठा समाज, धनगर समाजाचे आंदोलन आले. अशा सगळ्या परिस्थितीत यशस्विरित्या हातळणी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी केली. यामूळे नेतृत्व बदलाचा विषय येत नाही. कोणी कितीही काही म्हटले तरी,फडणवीस यांचे नेतृत्वात बदल होणार नाही”. असल्याचे स्पष्ट मत रावसाहेब दानवे यांनी केले. दरम्यान रस्त्यांचे कामे थांबली आहेत. या विषयी विचारले असता, दानवे म्हणाले, काळजी करू नका सरकार आमचे येणार आहे. निधीची उपलब्ध करून देणार असाही विश्वास दानवे व्यक्त केला.

बाळासाहेब असते तर असे घडलेच नसते

“राज्यात भाजप-शिवसेना एकत्र निवडणुक लढली. जनतेनेही युतीला महाजनादेश दिला. मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले होते. खर तर सत्ता स्थापनेसाठी जनतेने बहुमत दिले होते. या विषयी ठाकरे यांना फोन केला. मात्र त्यांनी घेतला नाही. आम्हाला मुख्यमंत्री देणार असेल तर बोला असे सांगत ते मुख्यमंत्री पदावर अडून होते. आज बाळासाहेब असते तर असे घडलेच नसते”. असा दावाही दानवे यांनी केला.

दानवे म्हणाले, १९९५ मध्ये आजची सारखेच सरकार आले होते. त्यावेळी युतीचे जनक बाळसाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी असे ठरवले होते. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे सुत्र ठरविण्यात आले होते. त्यावेळी मनोहर जोशी व नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. आणि भाजपचा उपमुख्यमंत्री झाले होते. जे सूत्र बाळासाहेबांनी आणि महाजनांनी घालून दिले होते. त्याच सूत्रांनी भाजप-शिवसेनेने जावे आणि जनमतचा आदर करावा. बाळासाहेब असते तर असे घडलेच नसते. असे सांगत शिवसेनला टोला लागवला.

महत्वाच्या बातम्या