वंचितमध्ये कोणताही सेल नसेल : प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीत मुस्लिम बांधवांना निश्चित सन्मान दिला जाणार आहे. मात्र, स्वतंत्र मुस्लिम सेल राहणार नाही. सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र सेल निर्माण करून तोडफोडीचे राजकारण केले. सर्वांना बरोबरीचे मानत असल्याने वंचितमध्ये कोणताही सेल राहणार नाही, असे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुस्लिम समाजाचा पक्ष प्रवेश व सत्ता संपादन परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक इलियास किरमानी, माजी नगरसेवक नासेर नहदी चाऊस, खाजा शर्फूद्दीन यांच्यासह प्राचार्य शेख सलीम, रमजानी खान, शारेक फारुकी यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

Loading...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी मुस्लिम व वंचित घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. सत्तावंचित हिंदूंचा मुस्लिमांवर राग होता. कारण त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सवर्णांना मुस्लिम सत्तेत बसवत होते. देशात ओबीसी राजकारण सुरू झाल्यावर चित्र बदलले. पूर्वी हिंदू-मुस्लिम तेढ कायम ठेवण्यासाठी बॉंबस्फोट घडवण्यात आले. आता मॉब लिंचिंगने तेढ वाढवली जात आहे. पद्धती बदलल्या; पण विचार कायम राहिला, असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ