राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही – प्रफुल्ल पटेल

वेबटीम : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप बरोबर सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा उठत होत्या. पण आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप सोबत जाणार नसल्याचे ट्विट करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी शरद पवार हे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारत कृषी मंत्री म्हणून शपथ घेणार अशा बातम्या चालवल्या होत्या पण आता प्रफुल्ल पटेल यांच्या ट्विट नंतर अशा बातम्यात तथ्य नसल्याच स्पष्ट झाल आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात – सुप्रिया सुळे
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुप्रिया सुळेंनीदेखील एमडीएतील सहभागाच्या वृत्ताचं खंडन केलंआहे . गेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, पण या अफवा कोण पसरवतं, हे उद्योग नेमकं कोण करतं, हे कळत नसल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.