काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही- डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे: सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस शिवाय देशाला तारुन नेऊ शकणार दुसरा कोणताही पक्ष नाही. असे श्रीपाल सबनीस म्हणाले, ते पुणे शहर ज़िल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पर्वती विधानसभा मतदार संघ कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

सर्वात जुना व देशाला लोकशाही मूल्ये रुजवणारा पक्ष म्हणून ख्याती असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने गांधीजींचा वारसा जपल्यास काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांत अधिक दृढ होईल. असेही सबनीस म्हणाले

दरम्यान, भाजपा कडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधान टीका करत असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. मेळाव्याला डॉ. श्रीपाल सबनीस, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...