fbpx

‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी महाआघाडी निर्माण केली असताना सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या सोबतचे मित्रपक्ष मात्र त्यांना सोडताना दिसत आहेत. येत्या निवडणुकीत शिवसेना भाजप सोबत जाणार नाही तर निवडणूक स्वतंत्र्यपणे लढवायची असा ठरावच राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये झाला आहे असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथे बोलताना केला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या आहेत असही यावेळी बोलताना खोतकरांनी सांगितले.त्यामुळे शिवसेना त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार कि भाजपसोबत जाणार हे काही दिवसातच कळणार आहे. शिवसेनेचे पाच खासदार युती झाली नाहीतर लढणार नाहीं अशी बातमी येऊन धडकत असतानाच खोतकरांचे हे विधान आले आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेची परिस्थिती तळ्यात-मळ्यात दिसत आहे. तर भाजपची शिवसेनेच्या बाबतीत धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय ! अशीच परीस्थिती सध्या तरी आहे.त्यामुळे युती होणार की नाही हा पेच अद्यापही कायम आहे.