बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक झालेली आहे. भाजपने देखील मनसेच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. हनुमान जयंतीला भाजप पक्षाकडून भोंग्याचे वाटप करण्यात आले. मात्र या सगळ्या प्रकाराबद्दल भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राज्यात चर्चेत असणारा भोंग्यांच्या वातावरणावरून खंत व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी जाहीरपणे खंत व्यक्त केली आहे. “धर्माधर्मात दुही निर्माण होत आहे, हे चित्र निराशाजनक आहे.’ असे वक्तव्य करून मुंडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
‘राज्यातील मशिदीवरील भोंगे हे ३ मे पर्यंत हटवले जावेत, नाहीतर मशिदीसमोरच दुप्पट आवाजात आम्ही हनुमान चालीसा लावणार,’ असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला होता. यानंतर राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या विषयावर खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, “धर्माधर्मात दुही निर्माण होते आहे, हे निश्चितच निराशाजनक आहे. आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी, कधीना कधी राजकीय लोकांना त्याला सोमोरे जावे लागणार आहे.”
याचवेळी प्रीतम मुंडे यांनी राजेश टोपे यांचं कौतुक केले आहे. “कोव्हीड काळात राज्यसरकारने चांगले काम केले अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली. राजकीय आरोप-प्रत्यारोप हा मुद्दा वेगळा. मात्र कोव्हीड काळात महाराष्ट्रासारख्या देशातील एका मोठा राज्यात आरोग्य व्यवस्थेवर संकट होतं. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असतानाही महाराष्ट्र सरकारने चांगली कामगिरी केली,” अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली.
भोंग्यांवरून प्रशासनाची भूमिका –
राज्यात भोंग्यांवरून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता पाहता, नाशिक पोलीस आयुक्तांनी नवे निर्देश जाहीर केले आहेत. नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांनी व इतरांनीही येत्या ३ मे पर्यंत भोंगे लावण्याची परवानगी घ्यावी. नाहीतर कडक कारवाई करून भोंगे हटवले जाईल. मशिद, मंदिर, गिरिजाघर, चर्च, गुरुद्वारा अशा सर्वच स्थळांसाठी हे आदेश लागू आहेत. ज्यांनी आपल्या प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्याची परवानगी घेतली नसेल त्यांनी आवाजाची मर्यादा पाळावी, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :