खा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी

वाशीम : वाशीम-यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित होते. मात्र, या बैठकीपूर्वी विकास कामात अडथला निर्माण करून शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला बाधा निर्माण का करता? म्हणत खा. भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आमने सामने आले आणि, तू-तू-मै-मै झाली.

गुंठेवारी जमिनीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात सोमवारी जोरदार खडाजंगी उडाली. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे समर्थक आमने-सामने आले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी, प्रजासत्ताकदिनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाशीम बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बुधवारी मंगरुळपीर, मानोरा आदी भागात तणाव होता.

यावेळी उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात काही शहरांमध्ये तणाव निर्माण झाला असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनूचित प्रकार घडला नाही. यानंतर आमदार पाटणी यांनी पत्रकार परीषद घेवून खा. गवळी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. खासदार भावना गवळी यांनीही विकासकामात अडथळा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

आमदार पाटणी यांची तक्रार
आ. पाटणी यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले की, ते त्यांचे स्वीय सहायक, अंगरक्षक मेन गेटमधुन नियोजन कार्यालयात प्रवेश करत असता गेट आतमधील पॅसेजमध्ये खा. भावना गवळी, आ. गोपीकिशन बाजोरीया व 50 ते 60 लोक उभे होते. तेव्हा या पॅसेजमध्ये खा. भावना गवळी यांनी आवाज दिला. त्यानंतर मला दमदाटी करत तुमच्या तक्रारी करीन तुम्हाला पाहुन घेईन अशा स्वरुपाची तक्रार दाखल केली.

खासदार गवळी यांची तक्रार
खा. गवळी यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले की, जिल्हा नियोजन भवनमध्ये डिपीडीसी ची बैठक असताना अंगरक्षक, स्वीय सहाकार्यासह मी जात असताना आ. गोपीकिशन बाजोरीया भेटले. त्याठिकाणी शेतकरी वर्ग व शहरातील काही मंडळी गुंठेवारी तसेच इतर समस्याकरीता मला व पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जमलेले होते. त्यावेळी आ. पाटणी यांच्यासह 70 ते 80 लोक सभागृहाबाहेर आले. आ. पाटणी यांनी मला व गोपीकिशन बाजोरीया यांना सांगितले गुंठेवारीच्या विषयामध्ये तुम्ही पडू नका. तुम्ही किती प्रयत्न केले तरी मी गुंठेवारीची खरेदी नियमीत होऊ देणार नाही. त्यानंतर त्यांनी अर्वाच्च भाषेत बोलणे सुरु केले. शहरातील विकासकामे होऊ न देण्याची धमकी दिली, अशा आशयाची तक्रार दिली.

महत्वाच्या बातम्या