fbpx

पवार गडकरी भेटीत आज दुध आंदोलनावर तोडगा निघाण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा –  महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चाची चर्चा देशाच्या राजधानीत पोहोचली आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते मा.केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक होवून दूधाच्या प्रश्नावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर जाणार होते मात्र तो दौरा रद्द करून शरद पवार दिल्लीत जाणार असून सायंकाळी गडकरी-पवार भेट होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून महाराष्ट्रात दूधाच्या प्रश्नावर आंदोलन पेटलं असून या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबईचं दूध तोडण्याचा निर्णय जाहीर केलाय. तीन दिवस पुरेल एवढा दुधाचासाठा मुंबईत असून या आंदोलनाला आणखी उखळी फुटली तर मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होईल.दुधाला लीटर मागे 5 रुपये भाव ही आमची मागणी आहे. 3 रुपये दरवाढ हा निर्णय दूध पावडर तयार करणाऱ्यांनी केलाय. फक्त दूध संकलन करणाऱ्यांचा हा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्न नाही असंही राजू शेट्टी यांनी सांगितल.

…तर गाठ आमच्याशी आहे ; राजू शेट्टींचा दूध संघांना इशारा

भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने देव, देवतांनाही राजकारणातून सोडले नाही !