बारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राचा राजकीय इतिहास शरद पवार या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्याला कारणही तसेच आहे . मागची जवळपास पन्नास वर्षे महाराष्ट्रातल्या राजकारणात शरद पवार यांचं महत्वाचं स्थान राहिलेलं आहे . एक सर्वसाधारण कार्यकर्ता, आमदार, मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि प्रधानमंत्री पदाचा दावेदार असा मोठा राजकीय प्रवास आहे. आज १२ डिसेंबर, शरद पवार यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने शरद पवार यांच्याबद्दलच्या काही गोष्टी…
1. शारदाबाई गोविंदराव पवार या शरद पवार यांच्या मातोश्री. त्या शेतकरी कामगार पक्षात सक्रिय होत्या, शेतकरी कामगार पक्षाकडून त्या जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य राहिल्या.

2. शरद पवारांच्या घरात अगदी जन्मापासूनच राजकारण होत. शरद पवार यांचे मोठे बंधू वसंतराव पवार यांनी देखील शेतकरी कामगार पक्षाकडून लोकसभेला नशीब आजमावून पाहिलं. पण या निवडणुकीत शरद पवार यांनी मात्र कॉंग्रेस पक्षाचा प्रचार केला होता.

3. यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कारण यशवंतराव चव्हाणांनी पवारांच्यातील नेता हेरला होता. सुरुवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच शरद पवार यांची वाटचाल झाली. पुढे यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. यशवंतराव चव्हाण शरद पवार यांना आपले मानसपुत्र मानत.

4. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात ‘मुलगाच हवा’ अशी मानसिकता समाजाची होती. १९६९ मध्ये शरद पवार यांना मुलगी झाली. पण त्यावेळी शरद पवारांनी स्वत: नसबंदी करत समाजाला आदर्श घालून दिला. पण जवळपास पाच दशकांपूर्वी पवारांचा हा निर्णय काळाच्या पुढचा होता.

5. राजकारणासोबतच शरद पवार यांनी खेळाचेही मैदान गाजवली आहेत. शरद पवार BCCI देखील अध्यक्ष होते. त्यानंतर शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचेही अध्यक्ष राहिले आहेत. क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक चर्चेत राहिलेली IPL स्पर्धा सुरु करण्यात पवार यांचा मोठा सहभाग होता.

6. सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने १० जून १९९९ रोजी शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. त्यांनतर लगेच झालेल्या१९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. पण त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

7. खिल्लारी इथे झालेल्यां भूकंपानंतर शरद पवार यांनी त्या परीस्थिती मध्ये तब्बल तीन महिने त्या ठिकाणी स्वतः तळ ठोकून तेथील पुनर्वसन योग्य प्रकारे केले. तसंच सन 2002 मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता. या भूकंपात मोठी हानी झाली होती. त्याठिकाणी देखील शरद पवार यांनी आपत्ती निवारणाचे काम केलं.

8. शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोद चा प्रयोग केला. पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले. १८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले.

9. शरद पवार आजपर्यंत एकही निवडणूक हरली नाही. १९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता.

10. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. कॉंग्रेस पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या. पण निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते.

11. नरसिंह राव सरकार मध्ये शरद पवार संरक्षणमंत्री होते. पण १९९३ साली नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली. पण त्यांनतर पवार मुख्यमंत्री असतानाच१९९५ मध्ये काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला आणि शिवसेना-भाजपा युती पहिल्यांदाच सत्तेत आले.

12. २०१७ साली त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. शरद पवार यांच्या सामाजिक कामाचा हा गौरव आहे.

You might also like
Comments
Loading...