मराठवाड्यात ‘आयटीआय’च्या एवढ्या जागा रिक्त; प्रतिसाद घटला!

iti

औरंगाबाद : सध्या आयटीआय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात चार फेर्‍यांमध्ये मराठवाड्याच्या आयटीआय संस्थामधील १४ हजार ९४८ जागांपैकी ८ हजार ६६५ जागा भरल्या आहे. तर ६ हजार १८३ जागा रिक्त राहिल्या आहे. रिक्त जागांचे प्रमाण पाहता आयटीआयला मिळणारा प्रतिसाद काही प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळत आहे.

दरवर्षी आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. यंदा औरंगाबाद विभागातून आयटीआय अभ्यासक्रमाला १९ हजार ६६४ जागांसाठी प्रवेश प्रकिया राबविण्यात येत आहे. पहिल्या फेरीत औरंगाबाद विभागातून ४ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर दुसऱ्या फेरीत २ हजार २०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. असे एकूण दोन फेऱ्यात ६ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

आता फेऱ्या संपल्या असून ६ हजार १८३ जागा रिक्त आहेत. मात्र गत वर्षीच्या तुलनेत आयटीआय अभ्यासक्रमाला मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी पहिल्या फेरीत २५ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतले होते. तर यंदा महाराष्ट्रातून पहिल्या फेरीत ३१ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. याशिवाय आयटीआयला मागील वर्षी दुसऱ्या फेरीत १३ हजार १०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर यंदा महाराष्ट्रातून एकूण १५ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतले आहेत. यावरून यंदा आयटीआयला विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट होते.

महत्त्वाच्या बातम्या