‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत’

टीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये विरोधकांनी भाजपविरोधात एकत्र येऊन आघाडी केली आहे. त्या आघाडी मध्ये भारिप बहुजन महासंघाची देखील जाण्याची तयारी आहे असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडी महासंघाची जाहीर सभा रविवारी अमरावती येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे. तसेच आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण चर्चा करायची असेल तर लगेच करा, आम्ही वाट पाहणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीला आमची गरज आहे. आम्ही काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे, मात्र आम्ही त्यांच्या भरवश्यावर नाही, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा देखील केली. गुणवंत देवपारे यांना लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवारी जाहीर कारण्यात आली आहे.