महाराष्ट्रात अनेक असे ‘ मोहल्ले ‘ आहेत जेथे बाहेरच्या देशातील ‘ मुल्ला – मौलवी ‘ येऊन भारतविरोधी कारस्थान रचतात : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात असे अनेक ‘ मोहल्ले ‘ आहेत. तेथे बाहेरच्या देशातील ‘ मुल्ला – मौलवी ‘ येत असून मोठं कारस्थान तयार होत आहे. या ठिकाणी पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही.याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली.
राज पुढे म्हणाले की माझ्याकडे काही महत्त्वाची माहिती आली आहे. त्या माहिती नुसार महाराष्ट्रात असे काही ‘ मोहल्ले ‘ आहेत जेथे अनेक बाहेरच्या देशातील ‘ मुल्ला -मौलवी ‘ येतात. ते काय करतात माहिती नाही. कारण तेथे पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही.

Loading...

त्या ठिकाणी काय शिजतंय, काय होणार आहे हे कळत नाही. परंतू मला जे कळलं आहे त्याप्रमाणे तेथे काही तरी मोठं कारस्थान घडवण्याचा डाव आतमध्ये शिजतो आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मी आज तुम्हाला कुठलीही जागा सांगणार नाही. मी योग्यव्यक्ती असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटून ही माहिती देणार आहे.

या सगळ्यासोबत राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिका सगळ्यात चर्चेची राहिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...