ममतांच्या सरकारचे कमी दिवस उरले आहेत – योगी आदित्यनाथ

टीम महाराष्ट्र देशा – पश्चिम बंगालमधील ममतांच्या जनविरोधी सरकारचे कमी दिवस उरले आहेत, अशी टीका तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारल्यानंतर योगी यांनी हे वक्तव्य केले आहे.

Loading...

बालूरघाट येथील गणतंत्र बचाव रॅलीला योगी संबोधित करणार होते. पण सभास्थळाजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे ते रॅलीत सहभागी होऊ शकले नाहीत. योगींनी यानंतर ऑडिओ लिंकच्या माध्यमातून रॅलीला संबोधित केले. मला तिथे येण्याची आणि तुम्हाला भेटण्याची परवानगी तृणमूल सरकारने न दिल्यामुळे तुमच्यासोबत बोलण्यासाठी मला मोदीजींच्या डिजिटल इंडियाची मदत घ्यावी लागत आहे. तृणमूल सरकार जनविरोधी, लोकशाही विरोधी आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेसोबत यांनी छेडछाड केली असल्याची टीका योगी यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील