सोशल मीडियावर ब्रह्मज्ञान, निवडणूक अर्ज भरताना कोरडे पाषाण!

औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अंबादास दानवे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहित नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूंचा पुनश्च सर्वकडे झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाने स्वतःच्या सोबत इतरांच्या काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी नेहमी मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टिंक्शन पालन करणे यासाारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त होतेय. याच पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लाईव्ह येत नागरिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मास्क, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे यासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारीच आमदार तथा शिवेसनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला अक्षरश: केराची टोपली दाखवली. सोमवारी (दि.२२) औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी राजकारण्यांनी सगळे नियम धाब्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसले.

औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. पंरतू याबाबत येथील राजकारणी बेफिकीर असल्याचे दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोरोना नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. पक्षाचे पदाधिकारी नाही, किमान लोकप्रतिनिधी म्हणून तरी अंबादास दानवेंनी याबाबत जागरूक राहायला हवे होते. मात्र, त्यांनी नियमांचे पालन करण्याऐवजी सोशल मीडियावर पोस्ट लिहून लोकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या