‘मग कपडे घातले नाहीत,असं वाटतंय का?’म्हणत अमृताने दिले सडेतोड उत्तर

amruta

मुंबई : हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचं चांगलच नाव आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज देखील चाहत्यांना खूप आवडतो. मात्र तिच्या एका फोटोला आलेल्या कमेंटमुळे अमृताने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

अमृताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो असून हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तसेच न्यूड मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. या ग्लॅमरस लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक करून अभिनेत्री हॉट स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. फोटोमधील अमृताच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत.

मात्र एका नेटकऱ्याने म्हणाला की, ‘मॅडम कपडे घालून सुद्धा फोटो छान येतात.’ ही कमेंट पाहून अभिनेत्री स्वतःला रोखू शकली नाही आणि तिने लगेचच याला प्रत्युत्तर दिलं. त्या कमेंटला रिप्लाय देत अमृता म्हणाली की, ‘मग कपडे घातले नाहीत, असं वाटतंय का तुम्हाला?’ अभिनेत्रीचे हे फोटो आणि हे प्रत्युत्तर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. अमृताचा आगामी प्रोजेक्ट म्हणजे सचिन कुंडलकरच्या ‘पॉंडिचेरी’ चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. नुकताच शेअर केलेल्या तिच्या या फोटोला मात्र भरपूर लाईक्स येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या