तेंव्हा काँग्रेसने शरद पवारांसोबत काय केले, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये असताना नेतृत्वाच्या डोळ्यास नजर भिडवली होती, त्यावेळी काँग्रेसने काय केलं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

शुक्रवारी विरोधकांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत मोठी खडाजंगी झाली. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी तसेच विरोधी पक्ष नेत्यांवर निशाणा साधला.

नरेंद्र मोदी आपल्या नजरेत नजर घालून बोलू शकतं नसल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी भाषणावेळी केली होती. गांधी यांच्या याच टीकेचा नरेंद्र मोदींनी समाचार घेतला.

मी तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही, कारण तुम्ही नामदार आहात आणि मी सामान्य घरातून आलेला कामदार असल्याची टीका यावेळी मोदी यांनी केली.

मोदी सरकार फक्त उद्योगपतींचे ! राज ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला निधी मिळतो, पण आंध्रप्रदेशच्या विकासाला नाही – टीडीपी

 

You might also like
Comments
Loading...