तर खासगी शाळेतील भरमसाठ फी संदर्भात निर्णय घेऊ- विनोद तावडे

मुंबई: २५ टक्के पालकांनी तक्रार केली तर खासगी शाळांकडून भरमसाठ फी आकारण्याचा संदर्भात निर्णय घेऊ. अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत अतुल भातखळकर, अस्लम शेख, आदी सदस्यांनी मुंबईतील काही खासगी शाळांमधील पालकांनी फीवाढीविरुद्ध लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, शिक्षणाच्या व्यापारीकरणास शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची प्रथा व शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) लागू करण्यात आला आहे.

खासगी शाळांकडून भरमसाठ फी आकारण्याचा तक्रारींची दखल घेण्यासाठी नेमलेल्या न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता शाळेतील २५ टक्के पालकांनी तक्रार केली तर शुल्क नियंत्रण समिती (एफआरसी) या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली. खासगी शाळांमधील भरमसाठ फी विरुध्द निर्णय घेणार असल्याचे विनोद तावडे म्हणाले.