fbpx

… तर नक्षलवाद्यांना आम्ही तिकीट देऊ – रामदास आठवले

पुणे – नक्षलवादी होऊन कुठल्याच व्यक्तीचं आजवर भलं झाल नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिसांचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं. आम्ही त्यांना आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) मध्ये सहभागी करून घेऊ, त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे .कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेल्या दंगलीनंतर पहिल्यांदाच पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा तसेच जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल आठवले यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर बोलताना आठवले यांनी आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले रामदास आठवले?

“नक्षलवादी होऊन कुठल्याच व्यक्तीचं आजवर भलं झाल नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिसांचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं. आम्ही त्यांना आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) मध्ये सहभागी करून घेऊ, त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ आणि मंत्री करू.मार्क्सवादी आमचे मित्र असू शकतात मात्र नक्षलवादी नाही त्यामुळे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी नक्षलवाद्यांच्या नादी लागू नये.नक्षलवादी होऊन कुठल्याच व्यक्तीचं आजवर भलं झाल नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिसांचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं. आम्ही त्यांना आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) मध्ये सहभागी करून घेऊ, त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ मेवानी हा खरचं आंबेडकरवादी असेल तर त्याने लाल सलाम न म्हणता जय भीम म्हणावं. जिग्नेश मेवानी यांना जर खरचं चांगला नेता व्हायचं असेल तर त्यांनी उलट सुलट भाषण करून आंबेडकरवादी तरुणांना भरकटवण्याचे काम करू नये.मी देखील सुरवातीला अशीच उलट सुलट भाषणे करत असायचो मात्र आता अशी भाषण करत नाही त्यामुळे मंत्री आहे.”