fbpx

…तर आम्ही ब्राम्हणांना वंचित मध्ये संधी देऊ : प्रकश आंबेडकर

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अनेक घटकातील नेतृत्वांना संधी दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ब्राम्हण समजतल्या एखाद्या नेतृत्वाला संधी देणार का असा प्रश्न विचारला असता वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक उत्तर दिले आहे. मला जर वंचित ब्राम्हण भेटला तर मी त्याला नक्की पक्षाच तिकीट देईल. मात्र तो ब्राम्हण वंचित असावा अशी माझी अट आहे, असे म्हणत प्रकश आंबेडकर यांनी मार्मिक उत्तर दिले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. वंचित आघाडी ब्राम्हण समाजातील नेतृत्वाला संधी देणार का म्हणजेच तिकीट देणार का असा प्रश्न विचारला. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ब्राम्हणाला तिकीट देण्यात माझी काहीच हरकत नाही. मला जर वंचित ब्राम्हण भेटला तर मी त्याला नक्की पक्षाच तिकीट देईल. मात्र तो ब्राम्हण वंचित असावा. तो well established नसावा. आंबेडकर पुढे म्हणाले की, वंचित आघाडीने बसपा प्रमुख मायावती यांच्याप्रमाणे वंचितांसाठी सोशल इंजिनीअरिंगचा वापर सुरु केला आहे. या सोशल इंजिनीअरिंगमुळेचं मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या.