आघाडीत बिघाडी :…तर आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत : रविकांत तुपकर

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदार कपिल पाटील यांनी लिहलेल्या पत्रामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पत्राच्या माध्यमातून छोट्या घटक पक्षांच्या मनातील खदखद पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या वादात आता स्वाभिमानी देखील उतरली असून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा इशारा देवून टाकला आहे.

दरम्यान, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे त्रस्त खा. राजू शेट्टी, आ. कपिल पाटील हे दोघेही बुधवारी दिल्लीत होते. काँग्रेस आणि भाजपा या दोघांनाही पर्याय ठरू शकेल, अशी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू असून त्या दृष्टीने त्यांनी दिल्लीत काही गाठीभेटी घेतल्या आहेत.

दरम्यान, एकेक जागा घ्या आणि आमच्या प्रचाराला या, अशी भाषा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात असून आम्हाला गृहित धरले जात आहे. असे असेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी दिला.

You might also like
Comments
Loading...