…तर ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू शकतात- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: लग्नानंतर जर पती अथवा पत्नीचं वय लग्नासाठी आवश्यक वयापेक्षा कमी असेल तर तर ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आपल्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार कोणतंही न्यायालय, कोणी व्यक्ती, संस्था अथवा संघटना हिसकावून घेऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून एप्रिल २०१७ च्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एकदा लग्न झाल्यानंतर रद्द करता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. लग्नानंतरही जर पती अथवा पत्नीचं वय लग्नासाठी आवश्यक वयापेक्षा कमी असेल तर तर ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

मुलाचं वय विवाहयोग्य २१ वर्ष नसेल तरीही पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहता येईल. विवाहयोग्य वय झाल्यानंतर लग्न करायचं की त्याआधी एकत्र राहायचं हा पती-पत्नीचा निर्णय आहे . कौटुंबिक हिंसा अधिनियम २००५ च्या स्त्रियांच्या संरक्षणाच्या तरतुदींनुसार लिव्ह इन रिलेशनशिपला आता विधीमंडळाने मान्यता दिली.

You might also like
Comments
Loading...