‘…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल’ : रामदास आठवले

ramdas athwale bmc

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे.

मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.

यासंदर्भात आता केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील वक्तव्य केलं आहे. येत्या काळात मुंबई महानगरपालिकेवर जर भाजपचा महापौर असेल, तर आरपीआयचा उपमहापौर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.

तर, येत्या काळात भाजप स्वबळावर लढणार असली, तर आमचे भाजपला समर्थन असेल. भाजप आणि आरपीआय मिळून शिवसेनेला महापालिकेपासून दूर ठेवू, असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या