‘नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे ‘राफेल’ जेट पण आले नसतं’

babita phogat

नवी दिल्ली- फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे.प्रशिक्षित टीम अंबालामध्ये  विमानांचा ताबा घेणार आहे.

ही पाच विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करून उद्या भारतात पोहोचतील. अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या राफेल विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी अंबाला हवाईतळही राफेल विमानांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे.

राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर अंबाला हवाई तळासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. तसेच, अंबाला हवाईतळाजवळील ३ किलोमीटरच्या परिसराला ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहे. ३ किलोमीटरच्या आत ड्रोनवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी सोमवारी फ्रान्समधून भारताकडे रवाना झाल्यानंतर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाटनं ट्विट केलं. तिनं लिहिलं की,”प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे ‘राफेल’ पण नसता.

महत्वाच्या बातम्या-

अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?

…तर शिवसेनेसोबत येण्यास भाजपा तयार: चंद्रकांत पाटील

चंद्रपूर जिल्ह्याला २०० युनिट विज मोफत द्या;आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपाल यांना निवेदन