…तर आघाडी टिकणार नाही, आघाडी वरून शरद पवारांच्या कोलांटउड्या

टीम महाराष्ट देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात होणाऱ्या मतभेदांच्या वृत्तांना रोज उधाण येत आहे. पण राष्ट्रवादीच्या पक्ष प्रमुखांनी मात्र या वृतांना स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होईल. शिवाय मित्रपक्षांनाही सोबत घेतलं जाईल. जागावाटपासंदर्भात कुठलाच संभ्रम नाही. असल्यास तो दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून सोडवतील.’ असा ठाम विश्वास ट्वीटर द्वारे शरद पवारांनी व्यक्त केला.

तर दुसरीकडे, गोंदिया येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र पवार यांनी आघाडी बाबत सूचक इशारा देताना .’सध्या काँग्रेसच्या पुढाकाराने महाआघाडी आकार घेत आहे, परंतु ही आघाडी देशपातळीवर नव्हे तर राज्यपातळीवर व्हायला हवी. जो पक्ष ज्या राज्यात मजबूत आहे त्याने मोठय़ा भावाची भूमिका वठवावी. इतरांनी त्याला सहकार्य करावे. नाही तर आघाडी टिकणार नाही, अस म्हंटल आहे. गोंदियामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान , शरद पवार यांच्याकडून रविवारी करण्यात आलेले ट्वीट आणि आज सकाळी पत्रकार परिषदेत करण्यात आलेले विधान निश्चितच संभ्रम निर्माण करणारे आहेत त्यामुळे पवार यांच्या डोक्यात नेमक चाललय काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.