२०१९ साली मोदींचे फेकू सरकार आले तर लिहून घ्या या देशात परत निवडणुका होणार नाहीत

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ साली नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर तुम्ही लिहून ठेवा देशात राष्ट्रपती राजवट लागू होवून नंतर केव्हाच निवडणुका होणार नाहीत. असा घणाघाती आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे.

तर संघ परिवार मोदीवर नाराज आहे. एनडीएच नव्हे तर भाजपच्या जागा कमी व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. असे झाल्यास नितीन गडकरी यांना पंतप्रधान करणे संघाला सोपे होईल, असा गौप्यस्फोट सुद्धा हार्दिक पटेल यांनी केला आहे. विदर्भ युथ फोरमच्यावतीने अकोल्यातील स्वराज भवनात एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, नागपुरात आल्यावर दीक्षाभूमीविषयी समजले. हा संघाचा बालेकिल्ला, हेडक्वार्टर आहे, असे सांगितले जाते. म्हणून नागपूर संघभूमी होत नाही. मुळात नागपूर ही दीक्षाभूमी आहे, असेही पटेल म्हणाले.