तर देशाचे दोन तुकडे करू… मुझप्फर हुसैन

टीम महाराष्ट्र देशा : ‘देशात गायी-म्हशींवरून जर मुस्लिमांच्या हत्या होणार असतील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. या देशात १९४७ साली फाळणी झाली आहे. जर या हत्या थांबल्या नाहीत तर पुन्हा देशाची फाळणी होईल’, असे वादग्रस्त वक्तव्य पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाचे नेते मुझप्फर हुसैन बैग यांनी केले आहे.

जर देशात मुस्लिमांच्या हत्या सुरूच राहिल्या तर देशाचे दोन तुकडे करू, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटणार आहे. पीडीपीच्या २८ व्या स्थापनेच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती देखील उपस्थित होत्या.मुझप्फर हुसैन बैग हे बारामुल्ला कुपवाडा मतदार संघाचे खासदार आहेत.

माझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली