मुंबई : राज्यात मागील वर्षी ऐनवेळी राजकीय गणित बदलल्यामुळे झालेलं सत्तांतर पाहायला मिळालं. भाजप-शिवसेनेच्या महायुतीला २०१९ निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं. मात्र, काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि विरोधी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली.
या सरकारवर गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं असून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत वर्तवलं जात आहे. अशातच, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यसरकार हे काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेत आहे. राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ती बगावत आहे. हे घटना बाह्य आहे, त्यामुळे केंद्र सरकार कदाचित राष्ट्रपती राजवट लावू शकते, असा इशाराच आंबेडकरांनी दिला आहे.
यासोबत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर देखील आगपाखड केली आहे. ‘फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, वंचीत बहुजन आघाडी बरोबर आघाडी झाली नाही. आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या’ असा खुलासा त्यांनी केला आहे.
तर, काँग्रेस पक्ष हा संपला असून आम्ही काँग्रेसला दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला, तरी पण काही उपयोग झाला नाही. ऐन निवडणुकीत हॉलिडे मूड मध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीला काय भवितव्य असणार ? असा टोला देखील त्यांनी खासदार व काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दानवे खासदार असल्याचं माहित आहे पण त्यांना ज्योतिषशास्त्र देखील कळतं याची कल्पना नव्हती’
- प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नाही : पाटील
- काँग्रेसमधील तरुण नेत्यांना भाजपमध्ये यावंसं वाटत, आम्ही त्यांना घेणार आणि सरकार बनवणार – पाटील
- सत्ता मिळत नसल्यानं ते अस्वस्थ आहेत, शरद पवारांचा जोरदार घणाघात
- लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी