…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

chandrakant_patil_

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. परंतु विरोधक हे यश इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याने मिळाले आहे असा आरोप होत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बोलताना ‘लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एईव्हएममध्ये गडबड झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. जर ईव्हीएम घोटाळा झाला तर मग बारामतीचे जागा कशी काय जिकून आली?. त्याचबरोबर जर खरच घोटाळा झाला असे वाटत असेल तर बारामतीमधून निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज गोरेगावमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली त्यावेळी बोलताना पाटील यांनी हे विधान केले आहे.