..तर बहीण-भावाचे शिक्षण पूर्ण होईल; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीनं केली आत्महत्या

पंढरपूर: आजवर दुष्काळ, सावकाराचे कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता वडिलांची परिस्थिती बिकट आहे त्यामुळे आपल्या लहान  बहीण-भावाचे शिक्षण थांबू नये म्हणून पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे ही घडता घडली असून आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव अनिशा ताठे असून ती अभियांत्रिकी डिप्लोमाचे शिक्षण घेत  होती. वडिलांची परिस्थिती बिकट असल्याने आपले शिक्षण थांबले तरच बहीण-भावाचे शिक्षण पूर्ण होईल, त्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचं अनिशाने सुसाईडनोटमध्ये  लिहिल आहे.

You might also like
Comments
Loading...