मुंबई: सचिन तेंडुलकर क्रिकेट जगतातील सर्वात मोठे नाव आहे. त्याने केलेल्या विक्रमांची सध्यातरी कोणी बरोबरी करू शकेल असे वाटत नाही. १०० शतक करणारा भारतीय क्रिकेट जगतातील देव म्हणून सचिनला सगळीकडून आदर आणि प्रेम मिळत असते. आणि त्याचे नाव आणि त्याचे करिअर सतत चर्चेत येत असते. मात्र पाकिस्तानच्या शोएब अख्तरने सचिनच्या करिअरबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याचे म्हणणे आहे कि सचिन तेंडुलकरने १ लाख शतक केले असते.
शोएब अख्तर त्याच्या युट्युब चॅनेलवर सद्याच्या काळात होणाऱ्या फलंदाजीबद्दल बोलत होता. त्यातच बोलताना त्याने सचिन तेंडुलकरचा संदर्भ घेतला. ज्यात बोलता बोलता त्याने हे वक्तव्य केले आहे. ” सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन नवीन बॉल मिळतात. त्यात नियम सुद्धा कठीण केले गेले आहेत. फलंदाजांना सध्या खूप जास्त सुविधा दिल्या जात आहेत. आमच्या वेळीजर कोणी ३ रिव्ह्यू दिले असते तर सचिनने नक्कीच १ लाख आंतरराष्ट्रीय शतक केले असते.”
शोएबचे असेही म्हणणे होते कि, सचिनने त्याच्या सुरुवातीच्या काळातच वसीम अक्रम , वकार युनिस , शेन वॉर्न सारख्या धडाकेबाज गोलंदाजांचा सामना केला आहे. आणि नंतरच्या काळात ब्रेट ली , तो स्वतः नंतर त्याने पुढील पिढीच्या वेगवान गोलंदाजांना खेळवले. म्हणूनच मी त्याला खूप ताकदवान फलंदाज म्हणतो असे सांगितले. सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारगिरीत १०० शतक केले आहे. तसेच ७८ वेळा शतक होण्याआधीच तो बाद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “वाईन विक्रीचा निर्णय संजय राऊत शेतकरी हिताचा सांगताहेत, जनता एवढी दुधखुळी नाही”
- ‘ठाकरे सरकारचा वसुलीचा धंदा…,’ कुंटेंनी केलेल्या खुलास्यानंतर सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘मास्कमुक्त महाराष्ट्र’ चर्चेवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
- “दूध का दूध म्हणणाऱ्या अनिल देशमुखांमागे खरे सूत्रधार कोण?”, अतुल भातखळकरांचा सवाल
- “अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत होते”, सीताराम कुंटेंचा गंभीर आरोप