मुंबई : बहुजनांचे संघर्षनायक नेते केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा दोन दिवसांत पूर्ववत करण्यात आली नाहीतर येत्या दि.17 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानी रिपाइं तर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बहुजन विद्यार्थी पतिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिलाआहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकार विरोधात मंगळवार दि. 12 जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्याचा ईशारा दिला.
दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा राज्य सरकार चा निर्णय हा राजकीय द्वेष भावनेतून आणि कोत्या मनोवृत्तीतून घेण्यात आलेला चुकीचा निर्णय आहे. त्याबाबत फेरविचार करण्याचे राज्य सरकार ला निर्देश द्यावेत या मागणीसाठी लवकरच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वात रिपाइंचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे रिपाइं तर्फे अधिकृत कळविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर सायनाचा थायलंड ओपनचा मार्ग मोकळा !
- सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडले पाहिजे; कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून नवाब मलीकांची टीका
- स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांवर यापूर्वी ‘अशी’ वेळ कधीही आली नव्हती : जयंत पाटील
- हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील- सचिन सावंत
- माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जो कुणी येईल त्याचा तिथंच बंदोबस्त केला जाईल – निलेश राणे