‘राऊतजी, तुम्ही राज्य सरकारवर पण खटला भरवणार का?’, चित्रा वाघ यांचा सवाल

chitra wagh vs sanjay raut

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

यावर महाराष्ट्र राज्याच्या भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत व महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्र सरकारवर खटला भरला पाहिजे. तर महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलेय. मग राज्यस रकारवर ही राऊत हे खटला भरणार आहेत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, दुसरीकडे अनेक भाजप नेते राऊत यांच्यावर टीका करत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले आहे. केंद्रावर दावा दाखल करण्याआधी राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP