fbpx

रेशन दुकानदारांनी अट्टाहासाने संप चालूच ठेवल्यास मेस्मा लावण्यासही मागेपुढे पाहणार नाही : बापट

ration_shop

टीम महाराष्ट्र देशा- रेशन दुकानदारांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहोत.मात्र रेशन दुकानदारांनी अट्टाहासाने संप चालूच ठेवल्यास आवश्यकता भासल्यास मेस्मा लावण्यासही सरकार मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला आहे .

दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी १ एप्रिलपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. राज्यात एकूण ५२ हजार रेशन दुकाने आहेत. त्यातील ४ हजार ३०० दुकाने संपात सहभागी झाली होती. त्यातील रायगड जिल्ह्यातील १ हजार ३६१ दुकानदारांनी संप मागे घेतला आहे.

रेशन दुकानदारांच्या बहुतांश मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. मात्र, शासकीय सेवेत सामावून घेत त्यांना ५० हजार पगार देण्याची मागणी पूर्ण करता येणार नाही.रेशन दुकानदारांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहोत.मात्र रेशन दुकानदारांनी अट्टाहासाने संप चालूच ठेवल्यास आवश्यकता भासल्यास मेस्मा लावण्यासही सरकार मागेपुढे पाहणार नाही असेही बापट यांनी स्पष्ट केले.