‘तर लोक तुडवतील!’ मराठा आरक्षण स्थगितीवरून खासदार उदयनराजे संतापले

Udayanraje Bhosale maratha arakshan

सातारा : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून आता यावर महाराष्ट्रात राजकारण प्रचंड तापलेलं आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळासोबत एक बैठक घेऊन यावर चर्चा केली होती. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली होती.

चर्चेला होत असलेला वेळ आणि निघालेली पोलिस भरती प्रक्रिया यावरून आता मराठा समाजात आरक्षणासाठी सरकारविरोधात संतप्त भावना निर्माण झाल्या असून आता यावर आंदोलने सुरू झाली आहेत. आरक्षणप्रकरणी सकल मराठा समाज संघटना आक्रमक झाली आहे, राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी पुणे, नाशिक, कोल्हापुर, सातारासह औरंगाबादमध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वारसदार असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती व खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे. आज एका वृत्तवाहिनीला खासदार उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ” मराठा समाजात उद्रेक वाढत असून समाजातील मागण्या लोकप्रतिनधींनी जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर अशाने उद्रेक वाढून लोक तुडवतील” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“पोराबाळांना काय तोंड देणार? आरक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच छत्रपती घराण्यात जन्मल्याने स्वाभिमान असून भाग्य देखील आहे. वेळ आल्यास मराठा समाजाचे नेतृत्व देखील करू. तसेच कोणत्याही समाजावर अन्याय झाल्यास आपण खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.” असे प्रतिपादन देखील म उदयनराजेंनी यावेळी केले.

आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर उदयनराजेंनी एका फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता.” जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे, ” असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-