…तर राष्ट्रवादीच्या फक्त २० आणि काँग्रेसच्या १० जागा आल्या असत्या, चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

chandrkant patil sharad pawar

कोल्हापुर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. याचे २ भाग सद्या प्रदर्शित झाले असून पवारांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले आहेत. जर शिवसेना नसती तर भाजपाचे ४०-५० आमदारचं आले असते, असे पवार म्हणाले आहेत. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी शरद पवार यांच्या निवडणुकीतील निकालाच्या वक्तव्यांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ असं आव्हानही पवारांना दिलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊत सरकार पाडून दाखवा असं म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही.”

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर

तसेच त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे, “तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.” यासोबतच, “पुढील निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी वेगवेगळं लढायचं असं ठरवू आणि लढून बघू. या येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर चारही पक्षांपैकी कुणाला किती बेस किती आहे हे बघू,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना भाजपच्या सत्तेचा दर्प वाटला नाही, असंही म्हटलं.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “त्या पक्षातील आमदारांना किंवा नेत्यांना आपला पक्ष कमकुवत वाटत असेल. त्यांच्या भविष्याबद्दल विश्वास द्यायला त्यांचा पक्ष कमी पडला असेल. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असेल. सचिन पायलट भाजपमध्ये आले की नाही हे एक-दोन दिवसातच स्पष्ट होईल.”

‘फडणवीसांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालावी, म्हणजे सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम दिसेल’