fbpx

…तर मोदी पुन्हा थापा मारणार नाहीत : रामदास आठवले

ramdas aatahavle

टीम महाराष्ट्र देशा : महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासनांची पूर्तता करतील. ते पुन्हा थापा मारणार नाहीत. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असली तरी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपली आहे. सध्या महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु आहे. त्यामुळे सर्व पक्षांतर्फे जिल्ह्य दौरे करण्यात येत आहे. याचदरम्यान रामदास आठवले यांनी नांदेड दौरा केला. त्यावेळी ज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे राज्य सरकार उपाययोजना करत आहे. केंद्राकडूनही मदत केली जात आहे. दुष्काळ निवारणासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. नव्या उद्योगांची उभारणी करावी लागेल तसेच शेतीला जोडधंदाही आवश्यक आहे, असे रामदास आठवले यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नांदेड जिल्ह्याला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणखी ५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासनांची पूर्तता करतील. ते पुन्हा थापा मारणार नाहीत, असेही त्यांनी म्हंटले. विशेष म्हणजे, देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच मी ज्यांना साथ देतो त्यांचीच सत्ता येते आणि मी भाजपा सोबत आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत.