‘…तर जीव वाचला असता’ ; राज बब्बर यांनी केले ‘हे’ भावनिक ट्वीट

raj bbbar

नवी दिल्ली : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात किती रुग्णांनी प्राण गमावले? असा प्रश्न मंगळवारी राज्यसभेत सरकारला विचारण्यात आला होता. त्यावर, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -19 रूग्णांचा मृत्यू झाला का? या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.

यावर आता विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राज बब्बर यांनी आज एक भावनिक ट्वीट केले आहे. रिक्षात आपल्या नवऱ्याला तोंडातून ऑक्सीजन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आग्र्यातील रेणु यांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच, रेणू यांनी पतीला वाचविण्यासाठी आपला प्राण पणाला लावला होता. त्यावेळी जर ऑक्सिजन मिळाला असता तर त्यांच्या पतीचा जीव वाचला असता, देशात कोरोनामुळे साडेचार लाख मृत्यू झाल्यानंतर देशात ऑक्सिजनच्या अभावामुळे कोणाचा मृत्यू झाला नाही असे सरकारचे म्हणणे आहे.’ असेही राज बब्बर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP