जालना – मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून आता विविध मराठा संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला अखिल भारतीय मराठा महासंघाने आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू असा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे.
न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, सरकार कोणाचंही असो, या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयातल्या फाईली जाळल्या आहेत, पुरावे नष्ट केले परंतु मराठा आरक्षणासाठी आता आम्ही सगळे मराठा तरूण अख्खं मंत्रालय जाळून टाकू. मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नये असं देखील ते म्हणाले. अगोदरच्या सरकारच धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण, असा होता तर आताच्या सरकारचा धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलांचं मरण, असं आहे. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लगेपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती न करण्याची मागणी अरविंद देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सकाळी पंढरपूरमध्ये नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन सकल मराठा समाजाच्या पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली. या मोर्चाला सुरुवात झाल्यावर काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परंतु पंढपूर येथील पोलीस मुख्यालयासमोर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा आडवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या