‘…तर भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो’ ; भारतीय खेळाडूचे मोठे वक्त्यव्य

वर्ल्डकप

इंग्लंड : भारतीय संघ तीन महिन्याच्या दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

या स्पर्धेच्या आधी भारतीय संघाला जास्त सरावाला जास्त वेळ मिळणार नाही परंतु  न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. न्यूझीलंडच्या संघाला अंतिम सामन्यात फायदा होईल असे अनेकांना वाटत आहे. याचदरम्यान भारताच्या एका खेळाडूने वर्ल्डकप संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. दिनेश कार्तिकच्या मते टी-२० वर्ल्डकप भारतीय संघ जिंकणार असल्याचं म्हंटल आहे.

आयपीएलमध्ये मध्ये खेळणाऱ्या भारताच्या या विकेटकीपरची भारतीय संघाकडून पुन्हा खेळण्याची इच्छा आहे. कार्तिक म्हणाला, मी संघात मधळ्या फळीत फिनिशरची भूमिका चांगल्या पार पाडू शकतो. मला वाटते की मधळ्या फळीत मी योगदान देऊ शकतो. तसेच मी टी-२० वर्ल्डकपमध्ये स्वत:चे कौशल्य दाखवू शकतो. यामुळेच भारतीय संघाला माझी गरज आहे. तसेच मी कौशल्य दाखवले तर भारताकडे वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे असेदेखील दिनेश कार्तिक म्हणाला आहे.

दिनेश कार्तिक सध्या संघातून बाहेर आहे. लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनल सामन्यासाठी दिनेश कार्तिक समालोचन करताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP