तरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्टेजवर जाणार – छगन भुजबळ

मुंबई: जामीन मिळाल्यानंतर आज राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सांताक्रूझ येथील घरी परतले आहेत, यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, मागील साडेतीन महिन्यापासून आपण आजारी आहोत. त्यामुळे येत्या काळात काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत, यातून तब्येत लवकर बरी झाल्यास १० जूनला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्टेजवर जाणार जाणार असल्याची यावेळी भुजबळ यांनी सांगितले.

जामीन मिळाल्यानंतर मला पहिला फोन शरद पवार यांचाच आला, दरम्यान, जेलमधील अनुभव विचारल्यावर ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे’ म्हणत त्यांनी आपले दुख व्यक्त केले. राजकारणात ह्या गोष्टी होतच असतात, लवकरच सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सदन सुंदर और बनानेवाला अंदर
मी ज्या महाराष्ट्र सदनासाठी जेलमध्ये गेलो, त्या सदनाचे सगळे लोक कौतुक करत आहेत, भाजप खासदारही महाराष्ट्र सदन सुंदर और बनानेवाला अंदर असल्याच म्हणतात अशी मिश्कील टिप्पणीही यावेळी भुजबळ यांनी केली.

पडत्या काळात शिवसेनेने साथ दिली आमचा 25 वर्षांपासूनचा ऋुणानुबंद
पडत्या काळात शिवसेनेने साथ दिली. माझ्याबद्दल त्यांनी दोन चांगले शब्द बोलले, आमचा 25 वर्षांपासूनचा ऋुणानुबंद आहे. म्हणून काल पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केल्याचं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या शिवसेनेशी वाढत्या जवळकीने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

You might also like
Comments
Loading...