…तर मी आंबेडकरांची घरी जाऊन माफी मागेन : जलील

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये फुट पडली आहे. मात्र वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी चर्चा केली तर नक्कीच आघाडी होईल, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील म्हणाले. जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

जलील म्हणाले की, राज्यातील जनता आता भाजप आणि काँग्रेसला कंटाळली असून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडे दुसरा मोठा पर्याय म्हणून पाहत होते. प्रकाश आंबेडकरांनी आताही ओवेसींना एक फोन केला तर आघाडी बाबात फेरविचार होऊ शकतो. आंबेडकरांनी माझ्याशी चर्चा न करण्याची भूमिका का घेतली? त्यांनी माझी चूक सांगावी मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आणि जाहीर सभेत देखील माफी मागेन.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएमची काडीमोड होण्याला इम्तियाज जलील यांना जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यावर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देतांना इम्तियाज जलील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत युती करतांना एमआयएमने जो प्रस्ताव बाळासाहेबांकडे दिला होता, त्यावर लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून निवडणूकीच्या तयारीला लागतील एवढा एकच फोन मी त्यांना केला होता.