…तर मी स्वत: सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेईन – भाई जगताप

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे. मात्र कुलाबा मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार दाखल केली आहे.

भाई जगताप यांनी १८ सील केलेले ईव्हीएम स्ट्राँग रूमऐवजी दुसरीकडे ठेवण्यात आले होते. मॉक पोल झालेल्या १५ ईव्हीएमची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी आवश्यक असते. मात्र, आयोगाच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना याबाबत माहितीच देण्यात आली नव्हती. पडताळणीपूर्वीच ८ ते ९ मशीन सील करण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकाराचा खुलासा आयोगाने करायला हवा असं ते म्हणाले आहेत.

या प्रकरणामुळे जवळपास २५ हजार मतांमध्ये फेरफार झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतची शंका दूर करण्यासाठी निकालानंतर युतीचे उमेदवार निवडून आलेल्या फक्त २५ जागांवर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. यातला निकाल आणि ईव्हीएमचा निकाल सारखा लागल्यास परत आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार नाही. मी स्वत: सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेईन असं जगताप म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यभरातून ईव्हीएम विषयी अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात मत एका पक्षाला केले तर दुसऱ्या पक्षाला जाते असे दावा करण्यात आले आहेत. तसेचं विरोधकांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात इंटरनेट बंद ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती परंतु ती निवडणूक आयोगाने फेटाळली आहे.

महत्वाच्या बातम्या