नाहीतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांना मारायला परत येऊ – बच्चू कडू 

नाशिक महापालिकेमधील तुफान राड्यानंतर अटक अन सुटका

वेबटीम : नाशिक महानगरपालिकेने अंपग पुनर्वसन कायदा १९९५ अद्याप पर्यंत अंमलात आणलेला नाही. तसेच अपंगांसाठी राखीव असणारा ३ टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्ण यांच्या अंगावर धावत जात हात उगारला. मात्र शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

यासर्व प्रकारानंतर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्हा न्यायालयात बच्चू कडू यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान येत्या दोन महिन्यात अंपग पुनर्वसन कायदा १९९५ अंतर्गत अपंगांसाठी राखीव असणारा ३ टक्के निधी त्यांच्यासाठी वापरला गेला नाही तर परत येवून अभिषेक कृष्ण यांना मारहाण करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे

पहा काय म्हणाले बच्चू कडू

You might also like
Comments
Loading...