तर अटक करून दाखवाच! हाफिज सईदचे पाक सरकारला आव्हान

हाफिज सईदला अमेरिकेनं जागतिक स्तरावरील दहशतवादी म्हणून घोषित केलं

इस्लामाबाद: कायद्यानं बंदी घातलेल्या जमात उद दावाचा म्होरक्या व मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने याने आता पाकिस्तानलाच धमकी दिली आहे. सरकारमध्ये हिम्मत असेल, तर अटक करून दाखवाच असे आव्हान त्याने पाक सरकारला दिले आहे. त्याच्या या धमकीमुळे आता पाकिस्तान सरकार समोरही नवे संकट उभे राहिले आहे. तसेच २०१८ वर्ष मी काश्मिरींसाठी अर्पण केलेलं आहे नी त्यात बदल होणार नाही. अशी धमकी हि त्याने दिली.

“भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानी मीडियातून त्याच्या कव्हरेजला बंदी घालण्यात आली आहे. जर मला दाबण्याचा प्रयत्न केला, तर मी पूर्ण ताकदीनिशी पुन्हा उभा राहिन.” अशी धमकी हाफिजने दिली आहे. विशेष म्हणजे हाफिज सईदला जागतिक स्तरावरील दहशतवादी म्हणून अमेरिकेनं घोषित केलं असूनही सईद उघडपणे पाकिस्तानमध्ये फिरत आहे व भारतविरोधी गरळ ओकत आहे. अमेरिका व भारताच्या दबावामुळे आम्हाला प्रसिद्धी देण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आल्याचा आरोपही त्यानं केला आहे.

You might also like
Comments
Loading...