…मग काय ‘भाभीजी के पापड’ खाऊन कोरोना जातो का- संजय राऊत

sanjay raut

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांने ‘भाभीजी का पापड’ खाल्ल्याने कोरोना संसर्ग होत नाही अस तथ्यहीन विधान केले होते. त्या विधाना आधार घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबद्दल भाजपला टोला लगावला. भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या याबाबत राज्यसभेत चर्चा सुरू होती तेव्हा खासदार संजय राऊत भाजपवर बरसले. महाराष्ट्र करोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरला अशी टीका करणाऱ्यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राज्यसभेत ते बोलत होते.

माझी आई आणि भावालाही करोनाची लागण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. धारावीतील परिस्थितीही नियंत्रणात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई महापालिकेच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टी लक्षात घ्याव्या, असं ते म्हणाले.

कोविडवर आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर झालेल्या चर्चेत संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांनी भाजपालाही टोला लगावला. लोक ‘भाभाजी पापड’ खाऊन बरे होतात, का असा सवालही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी हे पापड लाँच करत यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा दावा केला होता. यानंतर काही दिवसात हे मंत्री स्वतःच करोनाबाधित असल्याचं समोर आलं.

‘सदस्यांना मला विचारायचं आहे की एवढे लोक कसे काय बरे झाले? ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का? ही राजकीय लढाई नसून लोकांचे जीव वाचण्याची लढाई आहे’, असं संजय राऊत म्हणाले.केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सभागृहात देशभरातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. लॉकडाऊनमुळे १४ ते २९ लाख केसेस कमी करता आल्या आणि ३७ ते ७८ हजार जीव आपल्याला वाचवता आले, असं ते म्हणाले.

भारतात प्रति १० लाखांमागे सर्वात कमी मृत्यू आहेत, असंही त्यांनी सांगितलं.दिल्लीत महाराष्ट्रातील करोना परिस्थितीविषयीही टीका झाली. देशात सर्वाधिक करोना केसेस सध्या महाराष्ट्रात आहेत. बुधवारी राज्यात एकूण २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४७४ मृत्यू झाले. राज्यात सध्या एकूण ११.२१ लाख रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या