…तर शिवसेनेसोबत येण्यास भाजपा तयार: चंद्रकांत पाटील

chandrakant patil

कोल्हापुर: गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत लढलेल्या शिवसेनेने अचानक साथ सोडल्यानंतर भाजपची सत्ता राज्यातून गेली. त्यानंतर आकड्यांची जमवा-जमव करत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांची मिळून तयार झालेल्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात उदयास आले. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाकडून होणाऱ्या वारंवार टीका, नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी अशा संकट काळात सहामाही पूर्ण करत हे सरकार अजून टिकलेले आहे.

आता गेल्या ३ महिन्यात अनेक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजून एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. शिवसेनेला पुन्हा मैत्रीची हाक देत, “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याला २०० युनिट विज मोफत द्या;आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपाल यांना निवेदन

तसेच, काल नव्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्यासाठी तयारी करा, असे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. मात्र चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता आहेत.

बकरी ईद बाबत मंत्री नवाब मलिक यांचा खुलासा

दरम्यान, शिवसेनेला उपरती झाली, तर येतील, आम्ही काही प्रयत्न करणार नाही. भाजपने हात पुढे केला असे काही अर्थ काढू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलं. जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी वर्षभरात लालूंची साथ सोडली, तसं शिवसेनेला वाटलं, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून, त्याबाबत चर्चा होऊ शकते. पण या जर-तरच्या गोष्टी आहेत”.

जलसाठ्याचे सुयोग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्या – बच्चू कडू

त्यामुळे हे तीन-चाकी सरकार जास्त दिवस टिकणार नसून एकमेकांना लाथा मारत बाहेर पडतील असे वक्तव्य करणाऱ्या भाजपाने अचानक वेगळी भूमिका घेतली असून राजकीय हालचालींवर आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.