मुंबई : ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले असताना आता पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होणाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
जोपर्यंत ओबीसी आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत भाजपचा संघर्ष थांबणार नाही. येत्या निवडणुकीत 27% उमेदवार ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार आहे. तशी घोषणा आम्ही आधीच केली आहे. त्यांच्यासमोर काही समस्या आल्यास ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. सर्व काही केंद्रालाच करायचे असेल तर केंद्राला सरकार चालवायला सांगा. केवळ वसुलीसाठी तुम्ही सरकार स्थापन केले आहे का? अशी सडेतोड टीका करत प्रश्नही उपस्थितीत केले आहेत.
“महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये ओबीसी नेते आहेत. पण आघाडीतील पक्षांचे जे मालक आहेत, त्यांना ओबीसींचं हित हवंय, असं वाटत नाही. कारण त्या मालकांचं राजकारण ते राजकारण ओबीसीच्या भरवशावर नाही, तर त्यांच्या वापरावर चाललेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे मालक कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत,” असाही आरोप फडणवीसांनी केला.
तसेच ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा शेवटपर्यंत सुरु ठेवणार आहोत. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भाजपा ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. तो पर्यंत २७ टक्के तिकिटे आम्ही ओबीसींना देणार हा भाजपाचा निर्धार आहे. भाजपा हा पक्ष ओबीसींच्या विश्वासावर मोठा झाला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –