‘…तेव्हा अजिंक्य रहाणेला भारतीय संघातून वगळले पाहिजे’ 

rahane

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने इंग्लंड दौऱ्यावर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत . सातत्याने निराशाजनक कामगिरी केलीये, रहाणेच्या खराब कामगिरीमुळे सर्वत्र त्याच्यावर टीका होतना दिसत आहेत. तसेच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का दिली जात आहे आणि त्याला संघातून हा वगळले जात नाही असे सवाल देखील उपस्थित होत आहेत. राहणेची सातत्याने खराब कामगिरी असूनही, त्याला संघ व्यवस्थापनाने वारंवार संधी दिल्या, परंतु प्रत्येक वेळी त्याने अपेक्षा मोडल्या आहेत.

आता टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने यांनी रहाणेला कसोटी संघातून कधी वगळले पाहिजे हे सांगितले आहे. सेहवागच्या मते, रहाणेला भारतात खेळल्या जाणाऱ्या पुढील कसोटी मालिकेत संधी द्यायला हवी, पण जर तो इथेही अपयशी ठरला तर त्याला तिथेच थांबवले पाहिजे. इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांमध्ये 109 धावा करणारा रहाणे गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या प्रदीर्घ स्वरूपातील भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, पुन्हा पुन्हा संधी मिळाल्यानंतरही त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.

सोनी स्पोर्ट्सवर बोलताना सेहवाग म्हणाला की, ‘प्रत्येकजण वाईट काळातून जातो. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या खेळाडूला वाईट वेळी कसे वागवता, मग तुम्ही त्याला साथ द्या किंवा त्याला सोडून द्या. मला वाटते की भारतात पुढील मालिका होईल तेव्हा अजिंक्य रहाणेला संधी मिळाली पाहिजे. जर त्याने तिथे कामगिरी केली नाही तर तुम्ही म्हणू शकता तुमच्या योगदानासाठी खूप खूप धन्यवाद’

सेहवाग म्हणाला की, ‘मला वाटते जेव्हा तुमचा परदेश दौरा वाईट असेल तेव्हा तुम्हाला भारतात संधी मिळायला हवी कारण ती दर चार वर्षांनी एकदा येते, जर भारतात मालिका खराब असेल तर मी समजेल की परदेशातही त्याचा फॉर्म खराब होता. मग तो आता वगळण्यास पात्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या