… तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील

... तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते - गुलाबराव पाटील

पंढरपूर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आज पंढरपुरात होते त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाना साधला आणि एक मोठे वक्तव्य  पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील सतत काहीना काही टीका करत असतात आणि त्यांनी संयमाने भूमिका घेतली असती तर शिवसेनेचे ५६ आमदार हे आज भाजपसोबत असते असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे तसेच पुढे ते म्हणतात राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अर्थसाह्य पॅकेज जाहीर केले आहे मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांना अपुरे असल्याची खंतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

त्यानंतर पुढे गुलाबराव पाटील असेही म्हणाले की भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत याविषयी पाटील यांनी म्हटलं की या नगरसेवकांना भाजपने अपात्रतेची भीती दाखवली असावी. दरम्यान, पाटील यांचा हा दौरा त्यांनी केलेल्या या रोखठोक वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत राहिलेला दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या