…तर भारतातील ४० कोटी लोकांना होऊ शकते कोरोनाची लागण

नवी दिल्ली : गेले २ महिने कोरोनाने देशासह संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. चीन, इटली, अमेरिका, जर्मनी सह अनेक प्रमुख देशात कोरोनाने मृत्यू चे तांडव घातले आहे. भारतात देखील कोरोनाने आता पाय भक्कम करण्यास सुरुवात केली आहे.

सद्यस्थितीला १००० च्या आसपास नागरिक हे कोरोना बाधित आहेत. तर २५ हुन अधिक हे कोरोना मुळे मृत्यू पावले आहेत. जगभरात ६,६४,५९० रुग्ण असून ३०,८९० मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या आहे. मात्र हि संख्या यापेक्षाही अधिक असु शकते.

भारतीयांसाठी धक्कादायक बाब म्हणजे,अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये स्थित सेंटर फॉर डिसीज डायनामिक्स, इकॉनॉमी अँड पॉलिसी (सीडीडीईपी) यांनी आपल्या ताज्या अहवालात खुलासा केला आहे की, लॉकडाऊन हा एकमेव प्रतिबंधक उपाय भारतात होऊ शकत नाही. कोरोनावर कोणतेही ठोस उपचार अजून उपलब्ध नाहीत. अशातच जर भारतीयांनी अजून कडक सुरक्षितता बाळगली नाही तर मात्र अनर्थ घडु शकतो असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

अजूनही बरेच नागरिक योग्य ती खबरदारी न घेता सोशल डिस्टनसिंग ची पायमल्ली तर करत आहेतच, तर सोबतच प्रत्यक्ष भेटण्यावर, समोरासमोर येण्याचे टाळले नाही तर मात्र भारताची लोकसंख्या बघता, ३०-४० कोटी लोकांना हा कोरोना रोगाची लागण होऊ शकते. मग मात्र स्थिती हि हाताबाहेर जाऊन मृत्यु चे तांडव होऊ शकते. होय, जर हि परिस्थिती कायम राहिली तर जुलै पर्यँत हि संख्या ४० कोटींच्या घरात पोहोचल्या शिवाय राहणार नाही.

सीडीडीईपीचे संचालक डॉ. रामानन लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की, कोरोना विषाणूने नुकतेच भारतात पाय ठेवले आहे. लॉकडाउन बचावची नक्कीच एक पद्धत आहे. परंतु ही एक फूलप्रूफ सिस्टम नाही देशात सध्या २१ दिवसांचा लॉक डाऊन हा फक्त परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे परंतु ते प्रतिबंधात्मक नाही.

अनेक तज्ञांचे असे मत आहे कि, भारत हा आता ३ ऱ्या स्टेज च्या उंबरठ्यावर आहे. सध्या श्रीमंत, मध्यमवर्गीय हे रुग्ण आढळत असले तरी गरिबांना हि लागण होणे काही अशक्य नाही. त्यांना तर या बाबत लगेच समजुन न येता अनेक जणांना लागण होऊ शकते. त्यामुळे अगदी पंतप्रधानांपासुन, मुख्यमंत्री, अधिकारी, पोलीस, डॉक्टर अशा प्रत्येकाचे हेच सांगणे आहे कि, घरात योग्य खबरदारी बाळगुन पुढील आदेश येईपर्यंत खबरदारी घेऊन रहावे.